सरकारनामा ब्यूरो
कॅथलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडियाने (CBCI) दिल्लीत आयोजित केलेल्या ख्रिसमस सेलिब्रेशनला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.
1944 ला कॅथलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली.
(CBCI) हे देशभरातील सर्व चर्चचे प्रतिनिधित्व करते.
मोदींनी भारतातील कॅथलिक चर्चला पहिल्यादांच भेट दिली आहे.
यावेळी ख्रिसमस सेलिब्रेशनला नरेंद्र मोदींनी ख्रिश्चन समाजातील प्रमुख सदस्यांची भेट घेतली.
या चर्चचे मुख्य ओसवाल्ड कार्डिनल ग्रेसियस यांना त्यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त मोदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
येशू ख्रिस्ताच्यी शिकवण म्हणजे प्रेम, सुसंवाद आणि बंधुता साजरी करणे आहे. समाजातील हिंसाचारासारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपण आपल्या सदभावना टिकवून ठेवण्यासाठी एकत्र आले पाहिजे. अस यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले,