Jagdish Patil
रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वेने 'रेलवन' अॅप तयार केलं आहे. प्रवाशांना एकीकृत डिजिटल सेवा देण्याच्या उद्देशाने हे अॅप सुरू करण्यात आलं आहे.
'सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम्स'च्या (CRIS) 40 व्या स्थापना दिवसाचे औचित्य साधत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते या अॅपचं उद्घाटन करण्यात आलं.
या अॅपमध्ये प्रवाशांना गाडी क्रमांक, गाडीचं नेमकं लोकेशनसह किती जागा उपलब्ध आहेत याची माहिती एका क्लिकमध्ये मिळणार आहे.
गाड्यांचे वेळापत्रक, अनारक्षित प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंग, तत्काळ अन् प्रिमिअम गाड्यांचे बुकिंग या अॅपच्या माध्यमातून करता येईल.
सर्वात महत्वाचं या अॅपच्या माध्यमातून तुम्ही रेल्वे प्रवासादरम्यान ऑनलाइन जेवण ऑर्डर करू शकता.
तक्रारींचा निपटारा, फीडबॅक सिस्टिम, आपत्कालीन मदत अशा विविध सेवा त्यामध्ये देण्यात आल्या आहेत.
'रेल कनेक्ट' किंवा 'UTS ऑनलाइन' या अॅपचा यूजर आयडी वापरून 'रेलवन' अॅपमध्ये लॉग-इन करू शकता. तसंच रेल्वे 'ई-वॉलेट', सुरक्षा-सुविधेसाठी बायोमेट्रिक तसेच 'एम-पिन' लॉगिन ही या अॅपची वैशिष्ट्ये आहेत.