Aslam Shanedivan
अलिकडे भारत आणि पाकिस्तानमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर तणाव तयार झाला असून ऑपरेशन सिंदूरनंतर उभय देशातील संबंध ताणले गेले आहेत.
पण भारताने एकीकडे दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई करताना पाकिस्तामध्ये घुसून कारवाई केलीय. ज्यामुळे भारताचे जगभरात कौतुक होत आहे
दरम्यान आता भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या अधिकृत गाड्यांबद्दल सांगायचे झाल्यास येथेही मोदी शाहबाज शरीफ यांना सरस ठरतात
पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात बख्तरबंद लँड रोव्हर रेंज रोव्हर सेंटिनेल आणि बीएमडब्ल्यू 7 सिरीज सोबत मर्सिडीज मेबॅक 650 एस आणि टोयोटा लँड क्रूझर सारखी वाहने आहेत.
तर पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याकडे फक्त बीएमडब्ल्यू एक्स 5, टोयोटा लँड क्रूझर, बेंटले कॉन्टिनेंटल आणि मर्सिडीज मेबॅक सेडान ही वाहने आहेत
पंतप्रधान मोदींच्या ताफ्यातील या वाहनांची किंमत 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त असून ते बॉम्ब आणि गोळीबारासह अनेक प्रकारच्या हल्ल्यांना तोंड देऊ शकतात
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सुरक्षा ताफ्यातील सर्वात महत्त्वाची गाडी टोयोटा लँड क्रूझर असून ती सुरक्षेच्या दृष्टीने खूप चांगली आहे.
तसेच शरीफ यांच्या सुरक्षा ताफ्यात कोट्यवधी रुपये किमतीची सुपर लक्झरी सेडान मर्सिडीज मेबॅक आणि BMW X5 SUV आहे, ज्याची किंमत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.