Deepak Kulkarni
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशभरातच नाहीतर जगभरात क्रेझ वाढतेय.
मोदींचे राहणीमान,घर,भाषणशैली,गाड्या, कोट, फेटे, पेन यांसारख्या विविध गोष्टींविषयी सामान्य माणसांना प्रचंड उत्सुकता राहिलेली आहे.
पंतप्रधानांना नऊ वर्षांत जगभरातील 16 हून अधिक सर्वोच्च पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदींचा काही दिवसांपूर्वी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर चर्चांना उधाण आले.
मोदी हे संयुक्त अरब अमिरातमधील वर्ल्ड क्लायमेट ऍक्शन समिटमध्ये सहभागी झाले होते.
दुबईत पार पडलेल्या सीओपी 28 मध्ये इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींसोबत सेल्फी काढला.
सेल्फीनंतर मोदी कोणता मोबाईल वापरतात, यावरुन चर्चा रंगू लागल्या आहेत.
आता पंतप्रधानांच्या हातातील पांढऱ्या रंगाचा मोबाईल हा Apple कंपनीचा असण्याची शक्यता आहे.
मोदींकडे अॅपल कंपनीचा आयफोन 15 प्रो मॅक्स किंवा आयफोन 14 प्रो मॅक्स हा असू शकतो. तो अॅपल कंपनीचा सर्वात महागडा फोन असून त्याची किंमत साधारणपणे 1 लाख 70 हजारांपासून सुरु होते.