Rajanand More
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौरे नेहमीच चर्चेत असतात. ते ज्या देशात जातात, तिथे अत्यंत उत्साहात त्यांचे स्वागत केले जाते. या दौऱ्यांवर विरोधकांचेही बारकाईने लक्ष असते.
परदेश दौऱ्यांवर होत असलेल्या खर्चावरूनही विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधला जातो. चला तर मग आपण जाणून घेऊयात पंतप्रधानांचा कोणता दौरा सर्वाधिक महागडा ठरला?
राज्यसभेत नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, 2021 ते 2025 दरम्यान पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवर तब्बल 362 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
2021 मध्ये मोदींच्या परदेश दौऱ्यासाठी 36 कोटी, 2022 मध्ये 55 कोटी, 2023 मध्ये 93 कोटी तर 2024 मध्ये तब्बल 100 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.
पंतप्रधान मोदी यांचे 2025 मध्ये पहिल्या सात महिन्यांत 14 परदेश दौरे झाले आहेत. त्यासाठी आतापर्यंत 66.8 कोटी रुपये खर्च झाला असून सर्वाधिक 25.5 कोटींचा खर्च फ्रान्स दौऱ्यावर झालाय.
पंतप्रधान मोदींचा सर्वात महागडा परदेश दौरा अमेरिकेचा ठरला आहे. 2021 पासून आतापर्यंत मोदींनी चारवेळा अमेरिकेचा दौरा केला आहे. त्यासाठी 74.44 कोटी खर्च करण्यात आले.
पंतप्रधानांचे फ्रान्स आणि जपानचे दौरेही खर्चिक ठरले. या दौऱ्यांवर अनुक्रमे 41.29 कोटी आणि 32.96 कोटी रुपये खर्च झाला.
मोदींनी 2025 मध्ये 4 देशांचे दौर केले आहेत. त्यामध्ये थायलंड, अमेरिका सौदी अरेबिया, फ्रान्स, श्रीलंका आदी देशांचा समावेश आहे.