Rajanand More
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज (ता. 27 जुलै) वाढदिवस. त्यानिमित्त मुंबईतील मातोश्री निवासस्थानी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मातोश्री याठिकाणी जात उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा हा फोटो खास ठरला आहे. सोशल मीडियात सध्या हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या फोटोत दोघांच्या मागे बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो आहे.
राज ठाकरेंनीही सोशल मीडियात हाच फोटो पोस्ट केलाय. माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या, असे ते म्हणालेत.
शिवसेना आणि मनसेकडून हा फोटो सोशल मीडियात व्हायरल केला जात असून त्यावर ठाकरे ब्रँड असे लिहिले जात आहे.
खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियात पोस्ट केलेला हा फोटोही लक्ष वेधून घेतोय. सगळे एकत्र, काहीच अडचण नाही!, असे कॅप्शन त्यांनी दिले आहे.
मुंबईतील मराठी विजय मेळाव्यात काही दिवसांपूर्वीच उद्धव आणि राज ठाकरेंचे संपूर्ण कुटुंब एकत्र आले होते. त्यानंतर 22 दिवसांतील दोन्ही बंधूंची ही दुसरी भेट ठरली आहे.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधुंच्या युतीची ही नांदी ठरली आहे. दोन्ही बंधुंची युती जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे.