सरकारनामा ब्यूरो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यातील भगवान कल्की मंदिर धामची पायाभरणी केली.
मंदिर बांधकाम ट्रस्टचे अध्यक्ष आचार्य प्रमोद कृष्णम आणि स्वामी अवधेशानंद गिरी यांनी या वेळी त्यांचे स्वागत केले.
15 वर्षांहून अधिक काळ येथील मुख्य पुजारी असलेले आचार्य प्रमोद कृष्णम यांनी त्यांच्या गावात या धामची स्थापना केली आहे.
आचार्य प्रमोद कृष्णम हे काँग्रेस नेते आहेत. संभळमध्ये भव्य कल्की मंदिर बांधण्याचा संकल्प त्यांनी पूर्ण केला आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या उपस्थितीत वैदिक मंत्रोच्चारात मोदींनी मंदिराचे भूमिपूजन केले.
हे मंदिर भगवान विष्णूचा दहावा अवतार कल्की यांना समर्पित असेल. तसेच या मंदिरात विष्णूच्या 10 अवतारांसाठी स्वतंत्र गर्भगृहे असतील.
भूमिपूजन विधी संपल्यानंतर पंतप्रधान मोदींनी तेथील जनतेशी भाषणातून संवाद साधला.
'पूज्य संतांच्या भक्तीने आणि लोकांच्या भावनेने बनणारे हे कल्की धाम भारतीय श्रद्धेचे आणखी एक महान केंद्र होईल,' असे मोदींनी म्हटले.
R