Pradeep Pendhare
रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर आहेत.
भारत अन् रशियाचे अनेक दशकांपासून मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत.
भारत भेटीवर व्लादीमीर पुतिन अन् नरेंद्र मोदी यांच्यात अनेक मुद्यांवर चर्चा झाली.
यात सर्वात जास्त चर्चेचा क्षण म्हणजे, मोदींनी पुतिन यांना हिंदू धर्माचा सर्वात पवित्र ग्रंथ श्रीमद्भगवद्गीता भेट दिला.
पंतप्रधान मोदींनी पुतीन यांना रशियन भाषेत लिहिलेली श्रीमद्भगवद्गीता प्रत भेट दिली, पुतीन यांनी मोठ्या आदराने स्वीकारली.
या दौऱ्यामुळे दोन्ही देशांच्या नेत्यांमधील आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि भारत-रशिया संबंधांना एक नवीन आयाम मिळाला.
पुतिन यांना श्रीमद्भगवद्गीता भेट देताना मोदींनी त्याचा फोटोही सोशल मीडिया अकाउंट X वर शेअर केला.
औपचारिक चर्चेपूर्वी दोन्ही नेत्यांनी एका लहान सांस्कृतिक सत्राला हजेरी लावली, जिथं मोदींनी पुतिन यांना श्रीमद्भगवद्गीता भेट दिली.
2022 मध्ये युक्रेनशी युद्ध सुरू झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन पहिल्यांदाच भारतात आले आहेत.