Gig Workers Social Security Scheme : मोदी सरकारकडून गिग वर्कर्ससाठी मोठी योजना; जाणून घ्या काय आहे प्लॅन?

Pradeep Pendhare

गिग वर्कर्स योजना

सामाजिक सुरक्षेसाठी केंद्र सरकार योजना राबविताना, गिग वर्कर्सना केंद्रबिंदू ठेवला आहे.

Gig Workers Scheme | Sarkarnama

आर्थिक मदत

अपघात विमा, आरोग्य सुविधा, मातृत्व सहाय्य, वृद्धापकाळात सुरक्षा, रोख रक्कम, शैक्षणिक कर्ज आणि अन्य महत्त्वाच्या खर्चासाठी आर्थिक मदत देण्याची तयारी या योजनेत असणार आहे.

Gig Workers Scheme | Sarkarnma

सिक्युरिटी बोर्ड

गिग वर्कर्ससाठी 'नॅशनल सोशल सिक्युरिटी बोर्ड फॉर गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स' लागू करण्यास केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला आहे.

Gig Workers Scheme | Sarkarnama

सोशल फंड

बोर्डामार्फत गिग वर्कर्सच्या कल्याणासाठी विविध योजनांसह एक स्वतंत्र 'सोशल सिक्युरिटी फंड' देखील तयार केला जात आहे.

Gig Workers Scheme | Sarkarnama

वैद्यकीय सुविधा

या फंडाच्या माध्यमातून गिग वर्कर्सनां अपघात विमा, वैद्यकीय सुविधा आणि इतर आर्थिक मदत पुरवली जाणार आहे.

Gig Workers Scheme | Sarkarnama

योजनेला स्वरूप

या योजनांचे अंतिम स्वरूप निश्चित करण्यासाठी सरकार सध्या फंड मॅनेजर्स आणि इतर संबंधित घटकांशी चर्चा करत आहे.

Gig Workers Scheme | Sarkarnama

'ई-श्रम'वर नोंदणी

योजनेचा थेट लाभ गिग वर्कर्सना मिळावा, यासाठी 22 जूनपर्यंत 'ई-श्रम' पोर्टलशी जोडण्याचा आदेश सरकारनं दिले आहेत.

Gig Workers Scheme | Sarkarnama

'गिग वर्कर्स'

गिग वर्कर्स म्हणजे, पारंपारिक कर्मचारी-नियोक्ता या संबंधांच्या चौकटीबाहेर राहून ठराविक प्रोजेक्टच्या आधारावर काम करतात.

Gig Workers Scheme | Sarkarnama

'प्लॅटफॉर्म वर्कर्स'

प्लॅटफॉर्म वर्कर्स म्हणजे, एखाद्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून थेट लोकांना सेवा देतात. म्हणजेच ओला-उबरचे ड्रायव्हर्स किंवा स्विगी-झोमॅटोचे डिलिव्हरी बॉईज.

Gig Workers Scheme | Sarkarnama

गिग वर्कर्स संख्या

सध्या देशात सुमारे 1 कोटी गिग आणि प्लॅटफॉर्म वर्कर्स कार्यरत आहेत. या दशकाच्या अखेरीस ही संख्या वाढून 2.5 कोटींवर पोहोचू शकते, असा अंदाज सरकारनं व्यक्त केला आहे.

Gig Workers Scheme | Sarkarnama

NEXT : पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची मुलाखत...

येथे क्लिक करा :