सरकारनामा ब्यूरो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाताच्या मेट्रो स्टेशनहून विविध प्रकल्पांचे लोकार्पण तसेच भूमिपूजन केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेदेखील या कार्यक्रमात ऑनलाइन सहभागी झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले आहे.
उद्घाटनानंतर कोलकाताच्या हुगळी नदीमधील बोगद्यातून धावणाऱ्या या मेट्रोतून त्यांनी प्रवास केला.
प्रवासादरम्यान त्यांनी शालेय विद्यार्थ्यांशी मनसोक्त संवादही साधत या राइडचा आनंद लुटला.
हावडा मैदान-एस्प्लेनेड विभागादरम्यान ही मेट्रो धावणार आहे. तेथील अधिकाऱ्यांकडून याची माहिती त्यांनी घेतली.
मेट्रो स्टेशनवर नागरिकांनी मोठी गर्दी केली, जनतेलाही या वेळी त्यांनी संबोधले.
पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ते निगडी मेट्रो मार्गाचे त्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोलाही त्यांनी हिरवा झेंडा दाखवत उद्घाटन केले.
R