Roshan More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्यातील Z-Morh बोगद्याचे उद्घाटन केले
Z-Morh बोगद्याला सोनमर्ग बोगदा असेही म्हणतात.
8,650 फूट उंचीवर हा बोगदा असून आपत्कालीन परिस्थितीसाठी 7.5 मीटर रुंद समांतर मार्ग देखील येथे तयार करण्यात आला आहे.
सोनमर्ग बोगद्यामुळे (Z-Morh) गगनगीर ते सोनमर्ग पर्यंत विनाअडथळा वेगाना वाहतूक होणार आहे.
बोगद्यामुळे राष्ट्रीय महामार्ग-1 वरील प्रवासाचे अंतर 49 किमी वरून 43 किमी पर्यंत कमी होणार आहे.
येथून प्रवास करताना वाहनांचा वेग ताशी 30 किमीवरून 70 किमी होईल.
या बोगद्यामुळे परिसरातील पर्यटन आणि व्यवसाय वाढण्यास मदत होईल.