Mangesh Mahale
मुंबई पोर्टच्या Ballard Pier या ठिकाणी हे टर्मिनल उभारण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलचे आज ऑनलाईन उद्घाटन होणार आहे
या प्रकल्पासाठी सात हजार आठशे सत्तर कोटींहून अधिकची रक्कम खर्च करण्यात आली आहे.
सुमारे चार लाख पंधरा हजार चौरस फूट क्षेत्रफळात हे टर्मिनल उभारण्यात आले आहे.
एकाच वेळी दोन मोठ्या क्रूज जहाजांचे व्यवस्थापन करणे शक्य होईल. दररोज पाच क्रूज हाताळण्याची क्षमता आहे.
दररोज दहा हजार प्रवासी या टर्मिनलमधून प्रवास करू शकतात.
आधुनिक टर्मिनलमध्ये बावीस लिफ्ट, दहा एस्केलेटर आणि तीनशे वाहनांसाठी पार्किंगची सोय आहे.
लाटांसारखे छत, बहुस्तरीय कार पार्किंग, वैद्यकीय सुविधा, रेस्टॉरंट्स आणि खरेदीचे पर्यायही येथे उपलब्ध आहेत.
परदेशी प्रवाशांसाठी विशेष चेक-इन आणि इमिग्रेशन काउंटरची देखील सोय करण्यात आली आहे.