Rashmi Mane
राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चर्चा जोर धरत आहे.
या निवडणुकांच्या तयारीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवारी अंबरनाथ शहराच्या दौऱ्यावर आले होते. अंबरनाथमधील पनवेलकर हॉलमध्ये त्यांनी पदाधिकारी मेळाव्याचं आयोजन केलं होतं.
या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकांबाबत सजग राहण्याचं आवाहन केलं.
मतदार याद्यांचा नीट अभ्यास करणे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक मतदार यादीसाठी दोन बीएलओ नेमा आणि गटप्रमुखांना याद्यांची जबाबदारी द्या.
यावेळी अंबरनाथ शहराची नवी कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली. शहर संघटक, उपशहराध्यक्ष, विभागाध्यक्ष, उपविभागाध्यक्ष, शाखाध्यक्ष अशा विविध पदांसाठी नवे चेहरे पुढे आले आहेत.
अंबरनाथ शहरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी सांगितले की, “आतापासूनच मतदार याद्या तपासायला सुरुवात करा. बोगस मतदारांची नावे शोधा, कोणाची नावे वगळली आहेत किंवा नव्याने समाविष्ट झाली आहेत याची माहिती ठेवा.