Pradeep Pendhare
देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी मलेशिया दौऱ्यावर गेले आहेत. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्यासोबत मोदींची व्यापक चर्चा झाली.
दोन्ही देशांनी सेमीकंडक्टर क्षेत्रात सखोल सहकार्यासाठीच्या फ्रेमवर्कच्या करारासह एकूण 11करार आणि दस्तावेजांवर स्वाक्षऱ्या केल्या.PM Modi Malaysia tourPM Modi Malaysia tour
व्यापार व गुंतवणूक, संरक्षण, ऊर्जा, सेमीकंडक्टर निर्मिती या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक विस्तारण्याचा संकल्प केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देश इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील शांतता आणि स्थैर्याबाबत कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
दहशतवादाबाबत भारताची ठाम भूमिका असून, या लढ्यामध्ये कोणतीही तडजोड होणार नसल्याचा निर्धार मोदींनी व्यक्त केला.
मोदी आणि इब्राहिम यांनी व्यापार व्यवहारांसाठी भारतीय रुपया आणि मलेशियन रिंगिट या चलनांच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
मोदी यांनी मलेशियात भारतीय वाणिज्य दूतावास स्थापन करण्याचा भारताचा निर्णयही जाहीर केला.
भारत आणि मलेशियाने संयुक्त निवेदनात संयुक्त राष्ट्रे आणि फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स यांसह दहशतवादविरोधी द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सहकार्याचा निर्धार केला.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसह आंतरराष्ट्रीय संस्थांना अधिक प्रातिनिधिक बनवण्यासाठी दोन्ही देशांचा एकत्रित काम करण्याचा निर्धार.