Rashmi Mane
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात खोडद गावचा सुपुत्र रमेश खरमाळे यांचा गौरव!
सेनेतील सेवेनंतर रमेश खरमाळे वनखात्यात दाखल… सुरू झाली निसर्गसेवेची नवी वाटचाल.
खरमाळे यांनी सह्याद्रीच्या जंगलात पाणी अडवणारे 70 जलसोषक चर अवघ्या 60 दिवसांत खोदले!
पशुपक्षांसाठी जंगलात तळी निर्माण करून पाणवठे उपलब्ध केले.
रमेश यांची पत्नी स्वाती, मुलगा मयुरेश व मुलगी वैष्णवी यांनी देखील त्यांच्या प्रयत्नात त्यांना सक्षमपणे पाठिंबा दिला पर्यावरणसंवर्धन सहज शक्य झाले,
शेकडो विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण शिक्षण व्याख्यान, उपक्रमांमधून जनतेला जोडले.
"मन की बात"मध्ये पंतप्रधान मोदींनी त्यांच्या कार्याची प्रशंसा करत संपूर्ण देशापुढे ठेवले उदाहरण.
खरमाळे यांचा "शिवनेर भूषण", "इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स"सह अनेक सन्मानांनी गौरव करण्यात आला आहे.