Roshan More
ऑपरेशन सिंदूरनंतर परदेशात सर्वपक्षीय खासदारांची सात शिष्टमंडळ पाठवण्यात आली होती.
ही शिष्टमंडळे तब्बल 33 देशात गेली आणि भारताची आंतकवादाविरोधात भूमिका जगाला पटवून दिली.
सात शिष्टमंडळामध्ये तब्बल 51 नेता और 8 राजदूत यांचा समावेश होता.
परदेशातून परत आलेल्या शिष्टमंडळाची मंगळवारी (ता.10) सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिष्टमंडळात सहभागी झालेल्या नेत्यांशी संवाद साधत जगभर भारताची भूमिका पोहोचवल्याबद्द शब्बासकीची थाप दिली.
शिष्टमंडळाचे नेतृत्व खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. त्यांनी पंतप्रधानांच्या भेटीमध्ये त्यांना यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावरील दोन पुस्तके भेट दिली.
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व करताना अमेरिकेत भारताची भूमिका परखडपणे मांडली. थरूर यांच्या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्याशी हस्तांदोलन करत स्मितहस्य केले.