Pradeep Pendhare
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या आमदारांना महायुती मजबूत करण्यासोबतच एकमेकांशी समन्वय साधण्याची सूचना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या गुजरात दौऱ्याचा उल्लेख आमदारांच्या बैठकीत केला.
सामाजिक, राजकीय जीवनात काम करताना स्वत:च्या तब्येतीकडे लक्ष द्या, दरवर्षी मेडिकल चाचणी करून घ्या.
घरातील कुटुंबाकडे विशेष लक्ष द्या. सामाजिक जीवनात वावरताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका.
विधान परिषदेच्या आमदारांनी एखादा मतदारसंघ दत्तक घेऊन चांगले काम करावे.
सरकारी अधिकाऱ्यांसोबत नम्रपणे बोला, बदली आणि दलाली कामापासून स्वत:ला दूर ठेवा.
मतदारसंघात ज्यांनी तुम्हाला मतदान केले नाही, त्यांच्यासाठी काम करून विरोधकांनाही आपलेसे करा.
महायुतीतील एकोपा वाढवण्यासाठी आमदार, पदाधिकारी यांच्या एकमेकांच्या कार्यालयांना भेटी द्या.
गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या यशाचा फॉर्म्युला सांगताना गावोगावी डब्बा पार्टी आयोजित करा.