Narendra Modi Mumbai Road Show : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'मेगा रोड शो'; पाहा खास फोटो

Deepak Kulkarni

मोदींचा मुंबईमध्ये 'रोड शो'

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईमध्ये रोड शो झाला. 

उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांसाठी करण्यात आलेल्या या रोड शोला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

असा होता मार्ग...

घाटकोपरमधील अशोक सिल्क मिल ते पार्श्वनाथ मंदिर परिसरात रोड शोचा समारोप झाला .

मुंबईकरांची मोठी गर्दी...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या रोड शोमध्ये महायुतीचे नेतेमंडळी, पदाधिकारी, महिला कार्यकर्ते यांसह मुंबईकरांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती.

स्वागतासाठी वारकरीही...

घाटकोपर परिसर आज भगवामय झाला होता. साधू,संत, वारकरी देखील मोदींचे स्वागत करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले.

अजित पवार अनुपस्थित...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या रोड शोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले आहेत. पण अजित पवार अनुपस्थित होते.

एनडीए जुने रेकॉर्ड मोडणार...

यावेळी त्यांनी देशामध्ये एनडीए आपले जुने रेकॉर्ड मोडणार असल्याचं सांगून चारशेपेक्षा जास्त जागांवर उमेदवार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला. 

मुंबईतील जनतेचे मानले आभार

मोदींनी मुंबईतील जनतेचे आभार मानले. याचवेळी बाळासाहेब ठाकरेंच्या स्वप्नांतील मुंबई घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे असल्याचेही सांगितले.

NEXT : गांधी टोपी अन् गळ्यात उपरणं घातलेल्या मोदींच्या लुकची सर्वत्र चर्चा!