PM Narendra Modi News : पंतप्रधान मोदींसाठी खास ‘दिग्विजय पगडी’ !

Deepak Kulkarni

मराठा शौर्याची साक्ष...

ऐतिहासिक मराठा शौर्याची साक्ष देणाऱ्या, मोत्यांचा तुरा असलेल्या, शुभचिन्हे लावलेल्या आणि पंचधातूंनी सजवलेल्या या विशेष पगडीच्या शीर्षस्थानी साक्षात तुळजाभवानीची प्रतिमा आहे. 

PM Narendra Modi News | Sarkarnama

मोहोळांची संकल्पना...

महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पेनतून मुरुडकर झेंडेवाले यांनी ही पगडी साकारली आहे.

PM Narendra Modi News | Sarkarnama

'दिग्विजय पगडी' घालून सत्कार

पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पुण्यात सोमवारी (ता.29) झाली. यावेळी चारही उमेदवारांनी त्यांचा 'दिग्विजय पगडी' घालून सत्कार केला.

PM Narendra Modi News | Sarkarnama

दिग्विजय योद्धा पगडी नाव

'दिग्विजया'ला साजेशा सात घोड्यांच्या मंचकाची संकल्पना यातून प्रतीत होते. त्यामुळे तिला दिग्विजय योद्धा पगडी नाव दिले गेले आहे.

PM Narendra Modi News | Sarkarnama

मराठी परंपरेचा बाज आणि शौर्य...

दिग्विजयाची साक्ष देणारी ही पगडी आपल्या मराठी परंपरेचा बाज आणि शौर्य दर्शविणारी आहे’. 

PM Narendra Modi News | Sarkarnama

अभूतपूर्व आणि महाविजयाची साक्ष...

ऐतिहासिक, अभूतपूर्व आणि महाविजयाची साक्ष देणारे क्षण स्वतःला टिपता आले, याचं समाधान कायम राहील असंही मोहोळ या सभेनंतर म्हणाले.

PM Narendra Modi News | Sarkarnama

सभेला मोठी गर्दी

आपल्या आक्रमक भाषण शैलीने पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. या सभेला मोठी गर्दी जमली होती.

PM Narendra Modi News | Sarkarnama

भटकत्या आत्म्यांचे शिकार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचे नाव न घेता गेल्या काही वर्षांपासून राज्य काही भटकत्या आत्म्यांचे शिकार झाले आहे, असा टोला लगावला. आपल्या राजकीय इच्छा पूर्ण करण्यासाठी एका व्यक्तिने 45 वर्षांपासून राज्यात अस्थिरता निर्माण केली आहे,असे देखील पंतप्रधान मोदी म्हणाले.

PM Narendra Modi News | Sarkarnama

NEXT : पुण्यातील सभेत मोदींचा झंझावात; पाहा खास फोटो

PM Narendra Modi News | Sarkarnama