Pradeep Pendhare
2014 मध्ये सुमारे 25 कोटी इंटरनेट कनेक्शनवरून ती आज 97 कोटीपेक्षा जास्त झाली.
'यूपीआय'द्वारे वर्षाला 100 अब्जांपेक्षा जास्त आर्थिक व्यवहार होतात.
ओपन नेटवर्क फाॅर डिजिटल काॅमर्स (ओएनडीसी) क्रांतिकारी व्यासपीठ ठरले.
आधार, कोविन, डिजिलाॅकर, फास्टॅग, पीएम-वाणी आणि वन नेशन वन सबसक्रिप्शन जागतिक स्तरावर स्वीकारल्या.
'जी-20'च्या अध्यक्षपद काळात जागतिक डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा राखीव व सामाजिक प्रभाव निधीचा प्रारंभ केला.
भारतात स्टार्टअप चळवळ नसून, तंत्रज्ञानाला नवा आयाम देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
देशात 1.2 अब्ज डाॅलर खर्चाच्या तरतुदीसह 'इंडिया एआय मिशन' राबवले जात आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाअंतर्गत मानवता प्रथम तत्वाचा पुरस्कार करताना, देशभरात कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्रे स्थापना केली.
जागतिक डिजिटल नेतृत्वासाठी 'इंडिया फर्स्ट' पासून ते 'इंडिया फाॅर द वर्ल्ड', 'जगासाठी भारत', अशी पुढची वाटचाल राहणार आहे.