Rajanand More
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी पटना येथील तख्त श्री हरमंदिर साहिब गुरूद्वारा येथे भेट दिली. यावेळी त्यांनी प्रार्थनाही केली.
पंतप्रधान मोदी जवळपास 20 मिनिटे गुरुद्वारामध्ये होते. बिहारमधील प्रचारसभांना सुरूवात करण्यापुर्वी त्यांनी लंगरसेवा केली.
डोक्यावर पगडी परिधान करून मोदींनी पाटणा साहिब यांच्यापुढे माथा टेकवला. त्यानंतर व्यवस्थापन समितीने मोदींचा सन्मान केला.
मोदींनी गुरुद्वारामध्ये गुरूमहाराज यांच्या अस्त्र, शस्त्रांचे प्रदर्शन पाहिले.
गुरुद्वाराला भेट दिल्यानंतर मोदींनी पोळ्या लाटल्या.
पोळ्या लाटल्यानंतर मोदींनी प्रसाद तयार करण्यासाठी मदतही केली.
मोदींनी पंगतीतील लोकांना लंगरसेवाही दिली. शीख बांधवांशी संवादही साधला.
पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांनी एनडीए उमेदवारांच्या प्रचारासाठी रोड शो केला.
मोदींनी सोमवारी सकाळी इको पार्क येथे सुर्य नमस्कार केले. तिथून ते राज भवन येथे केले. त्यानंतर गुरूद्वारामध्ये पोहचले.