Jagdish Patil
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आणखी एका नवीन विक्रमाची नोंद झाली आहे.
मोदींनी शुक्रवारी (ता. 25 जुलै 2025) भारताचे पंतप्रधान म्हणून 4078 दिवस पूर्ण करत इंदिरा गांधींचा विक्रम मोडला आहे.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा विक्रम मोडत नरेंद्र मोदी आता सर्वाधिक काळ भारताचं पंतप्रधानपद भूषवणारे दुसरे नेते ठरलेत.
सर्वाधिक काळ पंतप्रधानपदाचा कारभार पाहणं या व्यतिरिक्त मोदींच्या नावावर आणखी काही रंजक विक्रम आहेत. त्याबाबतची माहिती जाणून घेऊया.
राज्य व केंद्रातील कारभार मिळून 24 वर्षांहून अधिक काळ सरकारचं नेतृत्व करण्याचा विक्रम मोदींनी केला आहे.
पंतप्रधान मोदी हे स्वतंत्र भारतात जन्मलेले पहिले व एकमेव पंतप्रधान आहेत.
शिवाय सर्वाधिक काळ भारताचं पंतप्रधानपद भूषवणारे ते एकमेव बिगर काँग्रेसी नेते आहेत.
भारतातील सर्व पंतप्रधान व विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपैकी ते एकमेव असे नेते आहेत, ज्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने सलग 6 निवडणुका जिंकल्या आहेत.
मोदींच्या नेतृत्वात लढवलेल्या 2002, 2007 व 2012 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला होता. तसंच त्यांच्याच नेतृत्वात लढवलेली 2014, 2019, 2024 ची लोकसभाही भाजपने जिंकली.