सरकारनामा ब्यूरो
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या बँकॉक दौऱ्यावर असून ते गुरुवारी (ता.3) सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पोहचले होते.
विमानतळावर पोहचल्यानंतर त्यांचे गार्ड ऑफ ऑनरने भव्य स्वागत करण्यात आले
पीएम मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर मोठ्या संख्येने भारतीय लोक उपस्थित होते. भारतीय लोकांनी मोदींना भारताचा तिरंगा दाखवत आनंद व्यक्त केला.
मोदीसाठी थायलंडच्या कालाकारांनी खास रामकियेन (थाई रामायन) कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी कलाकरांनी राम लक्ष्मण हनुमानाची वेशभूषा साकारली.
पीएम मोदींनी पिटोंगटार्न शिनावात्रा यांच्याशी व्यापारी आणि प्रतिनिधीमंडळ स्तरावरील चर्चा केली. त्यानंतर थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
भारत आणि थायलंडचे खूप जुने नाते असल्याचे सांगत पीएम मोदीने, पर्यटन, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रांवर चर्चा केली.
भारताच्या 'अॅक्ट ईस्ट' धोरणात आणि इंडो-पॅसिफिक व्हिजनमध्ये थायलंडचे विशेष स्थान आहे, असं यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले.
शिनावात्रा यांनी पीएम मोदींना 'त्रिपिटक' हा बौद्ध धर्माचे प्रमुख ग्रंथ भेट म्हणून दिला.