Ganesh Sonawane
Vaishnavi Munde अजित पवारांच्या बैठकीला दांडी मारलेल्या धनंजय मुंडे यांनी लेकीच्या 'फॅशन शो' ला हजेरी लावली आहे.
त्यामुळे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मुलीची चर्चा होत आहे.
धनंजय मुंडे यांची मुलगी वैष्णवीने मुंबईत एका फॅशन शो मध्ये सहभाग घेतला होता.
वैष्णवीने सोशल मीडीयावर फोटो पोस्ट करत त्याची माहिती दिली आहे.
हा फॅशन शो 'गेट वे ऑफ इंडिया' येथे पार पडला.
फॅशन शो'ला धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि लहान लेक अधीश्री उपस्थित होते.
धनंजय मुंडे यांच्या कुटुंबाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या फॅशन शो चा एक भाग होता आलं म्हणून वैष्णवीने आनंद व्यक्त केला आहे.