Roshan More
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरील आपल्या भाषणात विकसीत भारतासाठी ‘शक्तिची सप्तधारा’ सांगितली.
जागतिक मानकांनुसार टिकून राहण्यासाठी आपल्याला उत्पादन खर्च, दर्जा आणि व्यापकता या तीनही बाबतीत अत्यंत स्पर्धात्मक व्हावे लागेल.
शेती आणि अन्न प्रक्रिया क्षेत्राला गती देणे गरजेचे आहे. आपल्या भारतीय उत्पादनांची जगभरात 'ग्लोबल ब्रँड' म्हणून ओळख निर्माण करण्याची वेळ आली आहे.
भविष्यातील गरजा लक्षात घेता डिजिटल क्षेत्रासह दळणवळण व माहिती तंत्रज्ञानावर विशेष भर द्यावा लागेल.
येत्या काही वर्षांत देशातील वाहतूक आणि पायाभूत सुविधांचा विकास अधिक वेगाने आणि विनाअडथळा जोडण्यासाठी काम करणे आवश्यक आहे.
ड्रोन आणि सुपरसोनिक तंत्रज्ञानासारख्या आधुनिक व पुढील पिढीच्या संरक्षण तंत्रज्ञानावर भारताने अधिक भर देणे गरजेचे आहे.
पर्यावरणपूरक (Green) आणि सागरी संसाधनांवर आधारित (Blue) अर्थव्यवस्थेसाठी भारताकडे विपुल प्रमाणात साधनसंपत्ती उपलब्ध आहे.
योग, आयुर्वेद, सर्वांगीण आरोग्य, सर्जनशीलता आणि पर्यटन या भारताच्या 'सॉफ्ट पॉवर'ला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून दिली पाहिजे.