Rajanand More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बातमध्ये लठ्ठपणाविरोधात लढा या मोहिमेसाठी नागरिकांना आवाहन केले होते. त्यानंतर सोमवारी (ता. २४) त्यांनी दहा जणांची जनजागृतीसाठी निवड केली.
प्रसिध्द लेखिका आणि राज्यसभेच्या खासदार सुधा मुर्ती यांचा या यादीत समावेश आहे. त्यांचे वक्तृत्व आणि लेखनाचा चाहता वर्ग मोठा आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीमध्ये दोन पदके जिंकून मनू भाकरने इतिहास घडवला आहे. देशातील तरुणाईच्या गळ्यातील ती ताईत बनली आहे.
आनंद महिंद्रा हे महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष असून एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सक्रीय असतात. आगळ्यावेगळ्या, नाविण्यपूर्ण उपक्रमांना ते सतत प्रोत्साहन देतात.
जगप्रसिध्द इन्फोसिस कंपनीचे सहसंस्थापक म्हणून नंदन निलकेणी यांची ओळख आहे. त्यांनी काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूकही लढवली होते. आधार कार्डमध्येही त्यांचे मोठे योगदान आहे.
भोजपुरी चित्रपटांतील प्रसिध्द अभिनेते, गायक दिनेश लाल यादव हे निरहुआ या नावाने प्रसिध्द आहेत. ते भाजपचे माजी खासदार आहेत. उत्तर भारतात त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे.
ओमर अब्दुल्ला हे जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री आहेत. पंतप्रधान मोदींनी नॉमिनेट केलेल्या दहा जणांमध्ये ते एकमेव राजकारणी आहेत.
प्रसिध्द गायिका श्रेया घोषाल यांचे जगभरात चाहते आहेत. हिंदी, मराठीसह अन्य काही भाषांमध्ये त्यांनी गायलेली अनेक गाणी सुपरहिट ठरली आहे.
मल्याळम चित्रपटसृष्टीत सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक अभिनेते म्हणजे मोहनलाल. पद्मश्री, पद्मभूषण या पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
वेटलिफ्टर मीराबाई चानू. त्यांनी टोकियो ओलिम्पिकमध्ये देशाला पदक मिळवून दिले होते. या खेळात पदक मिळवणाऱ्या त्या केवळ तिसऱ्या महिला खेळाडू आहेत.
तमिळ चित्रपटसृष्टीतत लोकप्रिय ठरलेले अभिनेते आर. माधवन यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही नाव कमावले आहे.