Ragini Sonker : विधानसभेत CM योगींना भिडणाऱ्या आमदार रागिनी सोनकर कोण?

सरकारनामा ब्यूरो

अर्थसंकल्पीय अधिवेशन

उत्तर प्रदेश विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी समाजवादी पक्षाच्या आमदार रागिनी सोनकर यांनी प्रश्नांचा भडीमार करून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सळो की पळो करुन सोडले. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल...

Yogi Adityanath | Sarkarnama

रागिनी सोनकर आक्रमक

रागिनी सोनकर यांनी अर्थव्यवस्थेपासून ते इन्कम टॅक्स या महत्वाच्या विषयावर त्यांनी योगींना अडचणीत टाकणारे प्रश्न उपस्थित केले.

Ragini Sonker | Sarkarnama

शिक्षण किती?

अभ्यासात प्रचंड हुशार असलेल्या रागिनी यांनी त्याचे शिक्षण कोलकाता येथून पूर्ण केले. त्यांनी प्रसिध्द आर. जी. कर मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस केले.

Ragini Sonker | Sarkarnama

नेत्र चिकित्सक

दिल्लीतील AIIMS मधून त्यांनी नेत्र चिकित्सक म्हणून डिग्री मिळवली. यानंतर त्यांनी अनेक दिवस कोलकाता येथील रुग्णालयात काम केले.

Ragini Sonker | Sarkarnama

विवाह

2020ला फेब्रुवारी रागिणी यांचा विवाह व्यवसायाने डॉक्टर असलेले संबित मलिक यांच्याशी झाला.

Ragini Sonker | Sarkarnama

समाजवादी पक्षात सहभागी

रागिनी यांचे वडिल कैलाश नाथ सोनकर हे सुहेलदेव भारतीय समाजवादी पक्षातून 15 वर्षे आमदार होते. त्यानंतर रागिनी यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला.

Ragini Sonker | Sarkarnama

विधानसभेची निवडणूक

त्यांनी सपाच्या तिकीटावर जौनपूर जिल्ह्यातील मच्छली शहर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली. त्यांच्यासाठी ज्येष्ठ नेते जगदीश सोनकर यांचे तिकीट कापण्यात आले.

Ragini Sonker | Sarkarnama

मेहीलाल गौतम यांचा पराभव

2022च्या निवडणुकीत मच्छली शहर मतदारसंघातून भाजपाचे मेहीलाल गौतम यांचा 8484 मतांनी पराभव करत विजय मिळवला. यानंतर त्या खूप चर्चेत आल्या.

Ragini Sonker | Sarkarnama

महिला नेता

रागिनी सोनकर दलित समाजाच्या महिला नेता म्हणून प्रसिद्ध आहेत. तसेच यादव कुटुंबाशीही त्यांची जवळीक आहे.

Ragini Sonker | Sarkarnama

NEXT : रिक्षाचालकाची लेक झाली डेप्युटी कलेक्टर; जाणून घ्या आयशा अन्सारी यांची सक्सेस स्टोरी

येथे क्लिक करा...