Sooryagayathri : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलेली 17 वर्षांची सूर्यगायत्री कोण?

Roshan More

नरेंद्र मोदींकडून कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत प्रभु श्रीरामांवरील भजनाचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये भजन गाणारी केरळमधील गायिका सूर्यगायत्री आहे. सूर्यगायत्री हिचे कौतुक पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.

Sooryagayathri | Sooryagayathri

सात वर्षांपूर्वीचा व्हिडिओ

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर केलेला व्हिडिओ हा 7 वर्षापूर्वीचा आहे. या व्हिडिओमध्ये भजन म्हणणारी सूर्यगायत्री आता 17 वर्षांची आहे.

Sooryagayathri | Sooryagayathri

छोट्या वयातच गायनाला सुरुवात

गायत्रीने लहान वयातच गायनाला सुरुवात केली. तिने शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे.

Sooryagayathri | Sooryagayathri

सोशल मीडियावर सक्रिय

सूर्यगायत्री ही फेसबुकवर सक्रिय आहे. आपल्या गायनाचे वेगवेगळे व्हिडिओ ती तेथे पोस्ट करत असते. तिच्या नावाने तिची माहिती देणारी वेबसाईट देखील आहे.

Sooryagayathri | Sooryagayathri

'वंदे गुरु परंपराम'मध्ये सहभागी

कर्नाटकचे प्रसिद्ध गायक कुलदीप एम पई यांच्या आध्यात्मिक संगीत सीरीजमधील 'वंदे गुरु परंपराम' या अल्बममध्ये सूर्यगायत्री देखील होती.

Sooryagayathri | Sooryagayathri

आई वडील कलावंत

सूर्यगायत्री उत्तर केरळमधील वडकारातील पुरामेरी या गावातील रहिवासी आहे. तिचे वडील अनिल कुमार मृदंगम कलाकार तर, आई दिव्या कवयित्री आहेत.

Sooryagayathri

गुरु कोण?

गायक कुलदीप एम पई हे सूर्यगायत्रीचे गुरु आणि आध्यत्मिक मार्गदर्शक आहेत.

Sooryagayathri

NEXT : अभिनेत्रींपेक्षाही सुंदर ! कोण आहे आयपीएस अंशिका वर्मा ?

Anshika Verma | sarkarnama
येथे क्लिक करा