सरकारनामा ब्यूरो
भारतीय नौदलाने सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फूट उंचीचा पुतळा उभारला आहे.
अशा प्रेरणादायी पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनावरण केले.
या सोहळ्याच्या माध्यमातून नौदलाकडून शिवरायांना मानवंदना देण्यात आली.
नौदल दिन सिंधुदुर्ग या ठिकाणी साजरा करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे नौदलाचे जनक आहेत आणि ऐतिहासिक सागरी किनाऱ्यावरील राजकोट किल्ल्यावर नौदल दिन साजरा होत आहे.
शिवरायांचे प्रेरणादायी कर्तृत्व आणि साहस नेहमीच नौदलासाठी उपयुक्त ठरले, याची अनुभूती राहावी म्हणून हा पुतळा उभारला गेला.
सोहळ्यात नौदलाने त्यांची प्रात्यक्षिके सादर केली.
या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, नौदल सेनाप्रमुख आणि अन्य नेते उपस्थित होते.