Mangesh Mahale
पंतप्रधान झाल्यानंतर मोदी हे सातव्यांदा यूएईला जात आहेत. पंतप्रधान येथे द्विपक्षीय चर्चाही करतील.
संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान आणि दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांची ते भेट घेणार आहेत.
मोदी आज अबूधाबीच्या झायेद स्पोर्ट्स सिटी स्टेडियममध्ये भारतीयांशी संवाद साधणार आहेत.
कार्यक्रमाला 'अहलान मोदी' असे नाव देण्यात आले आहे. अहलन हा अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ स्वागत आहे.
मोदींच्या स्वागतासाठी भारतीयांमध्ये प्रचंड उत्साह आहे. यूएईमध्ये ३५ लाख भारतीय वास्तव्यास आहेत.
२७ एकरांत भव्य बी.ए.पी.एस. मंदिर तयार करण्यात आले आहे.
मोदी 14 फेब्रुवारी रोजी अबूधाबीमध्ये पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करतील.
मोदींच्या दौऱ्यापूर्वी स्वामीनारायण मंदिराचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.
R