सरकारनामा ब्यूरो
फ्लोअर टेस्ट ही संसदेत, विधिमंडळात वापरली जाणारी एक महत्त्वपूर्ण पद्धत आहे.
फ्लोअर टेस्टला ‘विश्वासदर्शक ठराव किंवा बहुमत चाचणी’ असेही म्हणतात.
सरकारने सभागृहाचा विश्वास सिद्ध करण्यासाठी मांडला जाणारा हा प्रस्ताव आहे.
विधानसभेतील ही पद्धत सर्व आमदारांच्या मतांद्वारे पार पडते.
विधिमंडळात मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याची परवानगी दिली जाते.
कलम 174 नुसार विधिमंडळ स्थगित करणे, बोलावणे आणि बरखास्त करण्याचे अधिकार केवळ राज्यपालांना असतात.
मतदान एकतर मौखिकपणे किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केले जाऊ शकते.
सभागृहातील उपस्थित आमदार मतदान करतात, जर मुख्यमंत्री हरले तर त्यांच्या सरकारला राजीनामा द्यावा लागतो.
R