सरकारनामा ब्यूरो
महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर शिक्षा देण्यासाठी आमचं सरकार कायदा कडक करीत आहेत. अत्याचार करणारी मानसिकता आपल्याला दूर करायची आहे.
महिलांवरील होणारे अत्याचार अक्षम्य पाप आहे. दोषी कोणीही असेल त्याला सोडू नका, त्याला कोणत्याही प्रकारे मदत करणारे वाचले नाही पाहिजे.
रुग्णालय, शाळा, पोलीस व्यवस्था, कोणत्याही ठिकाणी निष्काळजीपणा होत असेल तर हिशेब करा.
सरकार येईल जाईल, जीवनाची रक्षा, नारीची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. सर्व राज्य सरकारांना सांगतो, आणि राजकीय पक्षांना सांगतो
महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर शिक्षा देण्यासाठी आमचं सरकार कायदा कडक करत आहेत.
पीडितीला पोलिस ठाण्यात जायचं नसेल तर ई एफआयआर करू शकते. ई एफआयआरमध्ये कोणी छेडछाड करणार नाही याचीही व्यवस्था केली आहे.
महिलांचे सामर्थ्य वाढवण्याबरोबरच त्यांच्या सुरक्षेलाही देशाचा प्राधान्यक्रम आहे. महिला, मुलींच्या वेदना, त्यांचा राग मला समजत आहे.
NEXT: मुंबईच्या विकासाचं 'टार्गेट'