Rajanand More
पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी रविवारी (ता. 30) पहिल्यांदाच नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक मुख्यालयाला भेट दिली. त्यांच्यासोबत यावेळी सरसंघचालक मोहन भागवतही होते.
पंतप्रधान मोदींनी यावेळी डॉ. हेगडेवार स्मृती भवनाला भेट देत त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. हेडगेवार यांच्या समाधीचेही दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
RSS च्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य भैयाजी जोशी यांनी पंतप्रधान मोदींचे स्मृतिचिन्ह देत स्वागत केले.
डॉ. हेगडेवार स्मृती भवनामध्ये पंतप्रधानांनी नोंदवहीत आपल्या भावना लिहिल्या. आपल्या प्रयत्नांनी देशाचा गौरव सदैव वाढत राहो, असे त्यांनी म्हटले.
नागपुरातील दीक्षाभूमीलाही पंतप्रधानांनी भेट दिली. यावेळी ते गौतम बुध्दांच्या मुर्तीसमोर नतमस्तक झाले.
दीक्षाभूमी येथील स्तुपात ठेवण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचे पंतप्रधान मोदींनी दर्शन घेतले.
दीक्षाभूमीतील भंतेजींना पंतप्रधान मोदींनी वंदन केले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते.