Jagdish Patil
IPS सुधाकर पठारे यांचं तेलंगणातील श्रीशैलम येथून नागरकुरलूनकडे जात असताना अपघाती निधन झालं.
त्यांच्या कारची ट्रकसोबत धडक झाल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सुधाकर पठारे यांच्या निधनामुळे महाराष्ट्र पोलिस दलावर शोककळा पसरली आहे.
2011 बॅचचे IPS अधिकारी असलेले पठारे हे मूळचे पारनेर तालुक्यातील वाळवणे येथील होते.
IPS होण्याआधी त्यांनी शासनाच्या विविध खात्यांचं अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. तर एम.एस्सी. अॅग्री आणि एलएलबीचं शिक्षण त्यांनी घेतलं होतं.
स्पर्धा परीक्षा देताना 1995 साली जिल्हा विशेष लेखा परीक्षक झाल्यानंतर 1996 मध्ये त्यांची विक्रीकर अधिकारी म्हणून निवड झाली.
तर 1998 साली पोलिस उपअधीक्षक म्हणून निवड झाली. त्यांनी संघटित गुन्हेगारी (मोक्का), तडीपारी, MPDA अशा प्रतिबंधात्मक कारवाईंचा धडाका लावला होता.