सरकारनामा ब्यूरो
पंतप्रधान नरेंद्र मोदी आदिवासी गौरव दिवसानिमित्त आज 15 (नोव्हेंबर) ला बिहार जिल्ह्यातील जमुई येथे गेले होते. बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस येथे साजरा केला जातो.
आदिवासी गौरव दिवसानिमित्त नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजासाठी कोटी रुपयांच्या योजनांचे उद्घाटन केले आहे. यात उत्कर्ष योजना तयार केली असून आदिवासी समाजाच्या विकासासाठी 80 करोड रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त 150 रुपयांचे बिरसा मुंडा यांचे स्मारक असलेले नाणे,तिकीट तयार केले जाणार आहे.
आदिवासी समाज हा निसर्गाची सूर्य, वायूची पूजा करणारा समाज असल्याने बहुल या जिल्ह्यांमध्ये लवकरच आदिवासी समाजासाठी उद्यानांची निर्मिती करण्यात येणार आहे.
जनजातीय गौरव या कार्यक्रमांमध्ये आदिवासी समाजातील लोकाशी बोलून त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
कार्यक्रमांमुळे तेथील नागरिकांनी विविध पदार्थाचे,वस्तूचे स्टाॅल लावले होते. त्यांची पाहणी केली.
तामिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यातील रहिवासी धर्मदुराजी आणि एझिलारजी यांनीही त्यांचा स्टॉल लावला होता. यावेळी मादींने येथे थांबून त्याच्याबरोबर सेल्फी घेतली. हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.