सरकारनामा ब्यूरो
संसदेत अल्पसंख्याक समुदायातील 24 धार्मिक नेत्यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
नवीन संसद भवनात या धर्मगुरूंची उपस्थिती हे बदलत्या भारताचे एक सुंदर चित्र सादर करते आहे.
मोदींनी सगळ्यांसोबत संवाद साधला आणि आत्ताच्या परीस्थितीबद्दल चर्चा केली.
शिष्टमंडळात ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख इमाम उमर अहमद इलियासी हेही उपस्थित होते.
जगदीप धनखर यांचीही सगळ्यांनी यावेळी भेट घेतली.
बैठकीनंतर मोदी नेत्यांना म्हणाले, 'भारतातील विविध समुदायातील लोक कुटुंबासारखे एकत्र राहत आहेत.'
पंतप्रधान मोदींनी धर्मगुरुंसोबत काही फोटोही शेअर केले आहेत.
'सगळ्यांना भेटून आनंद झाला, देशाच्या विकासाच्या वाटेवर त्यांनी दिलेल्या प्रेमळ शब्दांबद्दल मी त्यांचे आभार मानतो'