अपघात झाला तर सरकार देणार मोफत उपचार; PM-RAHAT योजनेत नेमकं काय मिळतं?

Pradeep Pendhare

योजना नेमकी काय?

पीएम-राहत योजना ही केंद्र सरकारची रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींसाठी सुरू केलेली एक महत्त्वाची कॅशलेस उपचार योजना आहे.

PM-RAHAT Scheme | Sarkarnama

तीन विभाग एकत्र

पीएम राहत म्हणजे रोड अॅक्सिडेंट व्हिक्टिम हॉस्पिटलायझेशन अँड अ‍ॅश्युअर्ड ट्रीटमेंट स्कीम. पीएम राहत योजना वाहतूक, आरोग्य, विमा आणि पोलिस विभागांना एकत्र आणते.

PM-RAHAT Scheme | Sarkarnama

नेमका किती फायदा?

रस्ते अपघातात जखमी झालेल्या प्रत्येक नागरिकाला उपचारासाठी जास्तीत जास्त दीड लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळतात.

PM-RAHAT Scheme | Sarkarnama

कोण पात्र?

एखाद्या व्यक्तीला कोणत्याही राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग किंवा ग्रामीण रस्त्यावर अपघात झाला, तर तो या सुविधेचा लाभ घेऊ शकेल.

PM-RAHAT Scheme | Sarkarnama

उपचार कुठे मिळणार?

आयुष्मान भारत किंवा संबंधित राज्य आरोग्य योजनांमध्ये (MJPJAY) समाविष्ट असणारी सर्व अंगीकृत रुग्णालये या योजनेत पात्र आहेत.

PM-RAHAT Scheme | Sarkarnama

झंझट आहे का?

112 वर कॉल करून, रुग्णावाहिका बोलावून घेत, रुग्णालयात दाखल झाल्यावर अपघात अहवाल, रुग्णालयात दाखल करणे, उपचार, दावे दाखल करणे आणि रुग्णालयात भरती सर्व डिजिटल प्रणालीद्वारे होते.

PM-RAHAT Scheme | Sarkarnama

लाभ कसा मिळणार?

वाहनाचा विमा असल्यास, विमा कंपन्यांकडून पैसे दिले जातील. हिट-अँड-रन किंवा विमा नसलेल्या प्रकरणांमध्ये, केंद्र सरकार बजेटमधून निधी दिला जातो. दाव्याच्या मंजुरीनंतर 10 दिवसांच्या आत रुग्णालयाला पैसे जमा होतात.

PM-RAHAT Scheme | Sarkarnama

तक्रारीवर कारवाई

तक्रार उद्भवल्यास, जिल्हा रस्ता सुरक्षा समिती अंतर्गत सोडवल्या जातात. जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर समस्या सोडवण्याची जबाबदारी असते. यामुळे लोकांना चकरा मारण्याची गरज पडत नाही.

PM-RAHAT Scheme | Sarkarnama

वाहनचालकासाठी...

अपघात कधी सांगून होत नाही; PM-RAHATची माहिती मात्र आधीपासून असणं गरजेचे! ही माहिती तुमच्या कुटुंबीयांना आणि वाहन चालवणाऱ्या मित्रांना नक्की शेअर करा.

PM-RAHAT Scheme | Sarkarnama

NEXT : जरांगेंचं आंदोलन; सरकारसमोर 7 मोठे पेच

येथे क्लिक करा :