केंद्र सरकारची पेन्शन योजना! असंघटित कामगारांना मिळणार दरमहा 3000 रुपयांची पेन्शन

Aslam Shanedivan

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना

असंघटित क्षेत्रातील कामगारांना वृद्धापकाळात आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना सुरू केली आहे.

PM Shram Yogi Mandhan Scheme | Sarkarnama

निवृत्तीवेतन

या योजनेंतर्गत पात्र कामगारांना वयाच्या ६० वर्षांनंतर दरमहा तीन हजार रुपयांचे निवृत्तीवेतन (पेन्शन) दिलं जाणार आहे

PM Shram Yogi Mandhan Scheme | Sarkarnama

कोण पात्र ?

घरकामगार, रस्त्यावरील विक्रेते, कचरा वेचणारे, रिक्षाचालक, बांधकाम कामगार, शेतमजूर, बिडी कामगार, विणकर आणि तत्सम असंघटित क्षेत्रातील कामगारांना लाभ मिळणार आहे.

PM Shram Yogi Mandhan Scheme | Sarkarnama

कोणते कामगार पात्र?

घरकामगार, रस्त्यावरील विक्रेते, कचरा वेचणारे, रिक्षाचालक, बांधकाम कामगार, शेतमजूर, बिडी कामगार, विणकर आणि तत्सम असंघटित क्षेत्रातील कामगार या योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील.

PM Shram Yogi Mandhan Scheme | Sarkarnama

उद्दिष्ट्य

केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांना वृद्धापकाळात आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू केली आहे.

PM Shram Yogi Mandhan Scheme | Sarkarnama

वयोगट आणि उत्पन्नाची अट काय?

अर्जदाराचे वय १८ ते ४० वर्षाच्या दरम्यान तर मासिक उत्पन्न १५ हजार किंवा त्यापेक्षा कमी असावे. तो असंघटित क्षेत्रातील कामगार असावा तर ईपीएफओ, ईएसआयसी किंवा एनपीएसचा सदस्य नसावा. तसेच, तो आयकर दाता नसावा.

PM Shram Yogi Mandhan Scheme | Sarkarnama

योजनेचा लाभ?

प्रवेश वयानुसार (१८-४० वर्षे) दरमहा ५५ ते २०० पर्यंत योगदान द्यावे लागते. लाभार्थीचा मृत्यू झाल्यास, जोडीदारास ५० टक्के (१ हजार ५००) पेन्शन मिळते.

PM Shram Yogi Mandhan Scheme | Sarkarnama

नोंदणी प्रक्रिया

नोंदणी प्रक्रियेचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे जवळच्या 'कॉमन सर्व्हिस सेंटर' ला भेट देणे, आधार कार्ड, बैंक पासबुक, जनधन खाते आणि मोबाइल नंबर टाकून अर्ज करावे.

PM Shram Yogi Mandhan Scheme | Sarkarnama

किती पैसे भरावे लागणार?

१८ वर्षे वय असलेल्यांना ५५ प्रतिमहिना, २९ वर्षे वय असलेल्यांना १०० प्रतिमहिना, ४० वर्षे वय असलेल्यांना २०० प्रतिमहिना भरावे लागतात.

PM Shram Yogi Mandhan Scheme | Sarkarnama

जगात सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? सोन्याच्या साठ्याची आकडेवारी वाचून थक्क व्हाल...

आणखी पाहा