रस्त्यावर भाजी विकता? हातगाडी चालवता? मिळू शकते सरकारी कर्जाची मदत!

Pradeep Pendhare

व्यवसायासाठी कर्ज

रस्त्यावर भाजी, फळे विकता? चहाची टपरी किंवा हातगाडी चालवता? व्यवसायासाठी पैशांची गरज असेल तर केंद्र सरकारची योजना तुमच्या उपयोगी पडू शकते.

PM SVANidhi Yojana | Sarkarnama

PM SVANidhi

प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी म्हणजेच PM SVANidhi योजना असून, रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या पथविक्रेत्यांना व्यवसायासाठी खेळते भांडवल उपलब्ध करून देणे हा योजनेचा उद्देश आहे.

PM SVANidhi Yojana | Sarkarnama

कोणाला मिळू शकते कर्ज?

भाजी आणि फळविक्रेते, चहा, नाश्ता आणि खाद्यपदार्थ विक्रेते, हातगाडी आणि फेरीवाले, रस्त्यावर छोटे व्यवसाय करणारे आणि नाभिक, चर्मकार, धोबी यांसारखे रस्त्यावरील सेवा विक्रेत्यांना कर्ज मिळू शकते.

PM SVANidhi Yojana | Sarkarnama

किती मिळते कर्ज?

पहिले कर्ज 12 महिन्यांच्या परतफेडीवर 15,000 रुपये, दुसरे कर्ज 18 महिन्यांच्या परतफेडवर 25,000 रुपये, तिसरे कर्ज 36 महिन्यांच्या परतफेडीवर 50,000 रुपयांपर्यंत मिळते.

PM SVANidhi Yojana | Sarkarnama

व्याजात सवलत!

या योजनेत पात्र कर्जदारांना नियमित परतफेडीवर वार्षिक 7 टक्के व्याज अनुदान मिळते. हे अनुदान नियमानुसार थेट बँक खात्यात जमा होते.

PM SVANidhi Yojana | Sarkarnama

कॅशबॅक

UPI आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून कॅशबॅक दिला जातो. वर्षाला एकूण 1,600 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळतो.

PM SVANidhi Yojana | Sarkarnama

अर्जासाठी काय आवश्यक?

आधार कार्ड, बँक खात्याची माहिती, सक्रिय मोबाईल क्रमांक, UPI आयडी, Certificate of Vending (CoV) किंवा Letter of Recommendation (LoR) आवश्यक आहे.

PM SVANidhi Yojana | Sarkarnama

अर्ज कसा करायचा?

PM SVANidhi च्या अधिकृत पोर्टलवरून pmsvanidhi.mohua.gov.in किंवा मोबाईल ॲपद्वारे अर्ज करता येतो. तसेच महानगरपालिका, नगरपालिका किंवा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची मदत घेता येते.

PM SVANidhi Yojana | Sarkarnama

महत्त्वाची माहिती

PM SVANidhi योजनेची कर्ज वितरण मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे पात्र पथविक्रेत्यांना या योजनेचा लाभ घेण्याची संधी आहे.

PM SVANidhi Yojana | Sarkarnama

NEXT : जमावबंदी आणि संचारबंदीमध्ये नेमका फरक काय?

येथे क्लिक करा :