सरकारनामा ब्यूरो
केंद्र सरकारकडून पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेमुळे गरिब गरजू विद्यार्थांना या योजनेचा लाभ घेत येणार आहे. कशी आहे ही योजना आणि या योजनेचा अर्ज कसा भरायचा पाहूयात...
गरीब गरजू विद्यार्थांसाठी पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजने अंतर्गत उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्ज दिले जाणार आहे. सरकारने विद्यालक्ष्मी नावाने पोर्टल लाँच करणार आहे.
या पोर्टलच्या मदतीने विद्यार्थांना उत्तम शिक्षण मिळावे म्हणून विद्यार्थी शैक्षणिक कर्ज आणि व्याज अनुदानासाठी अर्ज करू शकणार आहेत. ई-व्हाउचर आणि सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) वॉलेटद्वारे व्याज अनुदान उपलब्ध होणार आहे.
पंतप्रधान विद्यालक्ष्मी पोर्टलवर अधिकृत नोंदणी (रजिस्टर) करावी लागेल. यानंतर यामध्ये मेल आयडी, नाव पत्ता व्यवस्थित टाकून लाॅगिन करायचं आहे. फॉर्म भरल्यानंतर, अर्जदार त्याच्या गरजेनुसार, पात्रता आणि सोयीनुसार शैक्षणिक कर्जासाठी सर्च करुन अर्ज करू शकतो.
रजिस्टर केल्यानंतर पोर्टलवर अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ज्यामध्ये विद्यार्थीची शैक्षणिक माहिती, कौटुंबिक माहिती भरायची आहे.
अर्ज भरताना आधार कार्ड, कुटुंबाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, इयत्ता 12 वी गुणपत्रिका, जातप्रमाणपत्र (लागू असेल तर), रहिवासी प्रमाणपत्र अशी काही महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहे.
या योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपर्यंत आहे आणि ज्यांना इतर सरकारी शिष्यवृत्ती किंवा अनुदानासाठी पात्र नाहीत, त्यांना 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर स्थगिती कालावधीत 3 टक्के व्याज अनुदान मिळेल.
या योजनमध्ये भारतातील उच्च शैक्षणिक संस्थाचा समावेश असणार आहे यामध्ये सरकारी आणि खाजगी संस्था असतील.