Mangesh Mahale
मिरा-भाईंदरमधील भाजपचे आमदार नरेंद्र मेहता हे पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या आदेशामुळे अडचणीत आले आहे.
नरेंद्र मेहता यांच्यावर भूखंड लाटण्याचा आणि 400 ते 500 कोटींहून अधिक स्टॅम्प ड्युटी बुडवल्याचा आरोप होत आहे.
अनेक आदिवासी लोकांच्या जमीन भाजपाच्या या आमदाराने हडपल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
सेव्हन इलेव्हन कंपनीचे मालक आहेत.त्यांनी जमिनींचे अनेक गैरव्यवहार केल्याचे आरोप आहेत.
रिअल इस्टेट व्यवसायी जय शुक्ला यांनी मेहतांनी फ्लॅट विक्रीच्या नावाखाली अडीच लाखांची फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे.
या प्रकरणी मेहतांवर गुन्हा दाखल आहे. मेहता यांनी मिरारोड येथील कांदळवन क्षेत्रात 'सेव्हन इलेव्हन क्लब' बांधला आहे.
हा बंगला नियमांचं उल्लंघन करुन बांधल्याची याचिका धीरज परब यांनी केल्यानंतर मुंबई हायकोर्टाने एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले.
सेव्हन इलेव्हन कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या जमिनी नोंदणीकृत न करता नाममात्र रकमेवर विकत घेतल्याचे आरोपही करण्यात आले आहेत.
मेहतांवर अपना घर प्रोजेक्टमध्ये 79 कोटींचा वाळू रॉयल्टी घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. मेट्रो उड्डाणपूल घोटाळ्यात 217 कोटींच्या प्रोजेक्ट 620 कोटींचा झाल्याचा आरोप आहे.