Jagdish Patil
पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीचा मुख्य कणा असलेल्या पीएमपीएल बसमधून प्रवास करणाऱ्यांना आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
कारण पुणे महानगर परिवहन महामंडळ बससेवेच्या तिकीट दरात उद्यापासून म्हणजेच 1 जूनपासून वाढ होणार आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये सुधारित स्टेज रचनेनुसार हे नवे दर लागू करण्यात येणार आहेत. जवळपास 10 वर्षानंतर PMPML च्या भाड्यात वाढ करण्यात येत आहे.
या नव्या दरांची अंमलबजावणी उद्या पहाटेपासूनच होईल. नव्या दर प्रणालीनुसार आता 5 ते 10 किमी अंतरावर आधारित 11 स्टेज निश्चित करण्यात आल्या आहेत.
त्यानुसार 1 ते 80 किमीपर्यंत प्रवाससाठी सुधारित तिकीट दर लागू करण्यास PMPML संचालक मंडळ आणि प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणे यांनी मान्यता दिली आहे.
प्रवासाचे एकूण 11 टप्पे असतील. यामध्ये 1 ते 30 किमी अंतरासाठीचा दर 5 किमी अंतराने 6 टप्पे. 30 ते 80 किमीसाठी 10 किलोमीटर अंतराने 5 टप्पे.
5 किमीसाठी 10 रुपये. 5.1 किमी ते 10 किलोमीटरसाठी 20 रुपये तर दहापासून पुढे 15 किलोमीटरसाठी 30 रुपये भाडे असेल.
15.1 ते 20 किलोमीटरपर्यंत 40 रुपये भाडे आकारले जाईल. या दरवाढीमुळे पासचे दरही वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे आता मासिक पाससाठी 900 ऐवजी पंधराशे रुपये लागतील.