सरकारनामा ब्युरो
पीएमआरडीच्या अपर जिल्हाधिकारी स्नेहल बर्गे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती.
त्यांच्या पश्चात्य बहीण आणि आई असा परिवार आहे.
स्नेहल बर्गे यांनी हवेली तालुक्याच्या प्रांतधिकारी म्हणून देखील काम पाहिले होते. ती त्यांची कारकिर्द चांगलीच गाजली होती.
अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतूक यावर त्यांनी कठोर कारवाई केली होती.
प्रांतधिकारी असताा भाजपच्या पदाधिकाऱ्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण गाजले होते.
स्नेहल यांनी त्यावेळी या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
स्नेहल यांच्या बहीण पल्लवी बर्गे या देखील पोलिस अधिक्षक पदी कार्यरत आहेत.
शिंदेंच्या आधी, PM मोदींवरही कविता; वादग्रस्त कुणाल कामरा कोण आहे?