Rajanand More
पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून नागरिकांना LPG गॅस पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
प्रामुख्याने देशात LPG चा वापर कमी व्हावा, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यावर उपाय म्हणून PNG कनेक्शन वाढवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.
केंद्रीय पेट्रोलियम संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी सांगितल्याप्रमाणे कंपन्यांकडून पीएनजी कनेक्शनसाठी सवलती दिल्या जात आहेत. त्यामध्ये मोफत गॅस, फी सवलती आदींचा समावेश आहे.
PNG च्या नवीन कनेक्शनवर कंपन्यांकडून ५०० रुपयांपर्यंत मोफत गॅस, सिक्युरिटी फी माफ अशा सवलती दिल्या जात आहेत. ३१ मार्चपर्यंत या सवलती असतील.
पीएनजी गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम २४ तास सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
मागील २५ दिवसांत पीएनजीच्या कनेक्शनमध्ये तब्बल अडीच लाखांनी वाढ झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली.
पीएनजी गॅस कनेक्शन उपलब्ध होत असूनही ते न घेतल्यास ग्राहकांना गॅस सिलिंडर मिळणार नाही, असे नोटीफिकेशनही सरकारने काढले आहे.
एलपीजी घरगुती सिलेंडंरसोबतच व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठाही वाढविण्यात आला आहे. त्यामुळे हॉटेलचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.