Aslam Shanedivan
अमेरिका-इज्राइल आणि इराणमधील युद्धाचा भडका उडाल्याने देशात गॅस टंचाईचे संकट गडद झाले आहे.
देशात इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर लोक 'बॅकअप' म्हणून एक्स्ट्रा सिलेंडर भरून ठेवत आहेत. याचा परिणाम सप्लायवर होत आहे.
पण आता ही छोटीशी सावधगिरी मोठ्या कायदेशीर कचाट्यात येणार असून सिलेंडरची साठवणूक करणे गुन्हा ठरणार आहे.
याबाबत पेट्रोलियम मंत्रालयाने नियम अत्यंत कडक केले असून घरात 'डबल' कनेक्शन असणंही गुन्ह्याच्या श्रेणीत येणार आहे.
सरकारी नियमांनुसार, जास्तीत जास्त दोन सिलेंडर ठेवण्याची परवानगी आहे. पण या पेक्षा जास्त एलपीजी ठेवला, तर तो 'साठेबाजी' मानला जाईल.
दोषी आढळल्यास 3 महिने ते 7 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो. तसेच जप्तीची कारवाईही होवू शकते आणि गॅस कनेक्शन कायमचे रद्द केले जाऊ शकते.
तर हा नवाव कायदा ज्यांच्या घरी पाईपलाईन गॅसची (PNG) सुविधा आहे, त्यांना लागू आहे. यामुळे त्यांना एलपीजी सिलेंडर ठेवता येणार नाही
तर PNG असताही एलपीजी कनेक्शन वापरने बेकायदेशीर ठरणार असून त्यांनी तातडीने सिलेंडर सरेंडर करावे लागणार आहे
तसेच स्वतःहून कनेक्शन परत केले तर कोणताही दंड होणार नाही. पण, तपासणीत दोन्ही कनेक्शन आढळल्यास कायदेशीर कारवाई अटळ आहे