सरकारनामा ब्यूरो
निखिल कामथ यांच्या 'पीपल बाई डब्ल्यूटीएफ'या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेस्ट म्हणून बोलावण्यात आले होते.
या पॉडकास्टच्या एपिसोडला 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जनता'असे शीर्षक देण्यात आले आहे.
पॉडकास्टदरम्यान पंतप्रधानांना निखिल कामथ यांनी महत्वाच्या विषयांवर अनेक प्रश्न विचारले. ते कोणते? आणि त्यावर पंतप्रधान मोदी काय म्हणाले, जाणून घेऊयात...
युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरु असलेल्या युद्धाबाबत कामथ यांनी मोदींना प्रश्न विचारला तेव्हा त्याचं उत्तर देताना ते म्हणाले,युद्धाबाबत आम्ही सातत्याने म्हणत आलो आहोत की, मी शांततेच्या बाजूने आहे.जगात शांतता नांदावी.
युवक राजकारणाकडे कसे पाहतात यावर चांगल्या लोकांनी एक मिशन घेऊन राजकारणात येणं गरजेचं आहे, असं मोदी म्हणाले.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या भेटीविषयी आणि मैत्रींवर होणाऱ्या चर्चेवर त्यांनी मोजक्याच शब्दांत उत्तर दिलं.ते म्हणाले,मेलोनी यांच्यासोबतच्या 'मीम्स' या तर सुरूच असतात.मी त्यात माझा वेळ वाया घालवू इच्छित नाही.
पंतप्रधानांनी 2014 मध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष 'शी जिनपिंग' यांनी भारताला भेट देण्याची इच्छा व्यक्त करतानाच'मला गुजरात आणि तुमच्या वडनगर या गावात यायचं असल्याचा किस्साही यावेळी सांगितला.
नरेंद्र मोदींना त्यांच्या दोन इच्छा पूर्ण केल्याचं समाधानही व्यक्त केलं.ज्या त्यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान झाल्यावर पूर्ण केल्या. सीएम झाल्यावर त्यांनी एक म्हणजे शाळेतील मित्र, ज्यांच्या घरी ते जेवले त्यांच्यासह स्वत:च्या कुटुंबातील लोकांना बोलावलं.
त्यानंतर पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी शाळेतील शिक्षकांचा सन्मान करण्याची दुसरी इच्छा पूर्ण केल्याचे या पॉडकास्टमध्ये सांगितलं.