Police Bharti 2025 : पोलिसात भरती व्हायचंय? 'वर्दी'चे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी! A ते Z माहिती फक्त एका क्लिकवर...

Rashmi Mane

पोलिस भरती मोठी संधी

महाराष्ट्रात पोलीस भरती 2025 ची मोठी प्रक्रिया सुरू झाली असून यावर्षी तब्बल 15,300 पदांसाठी उमेदवारांना संधी उपलब्ध झाली आहे.

Police Bharti | Sarkarnama

या पदांचा समावेश

या भरतीत पोलीस शिपाई, SRPF, वाहन चालक, बॅन्डस्मन आणि कारागृह शिपाई या पदांचा समावेश आहे.

Maharashtra Police Bharti 2025 | Sarkarnama

शेवटची तारीख

इच्छुक उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया सुरू केली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे.

Maharashtra Police Bharti 2025

पदांचा तपशील

पोलीस शिपाई पदांसाठी 12,624 पदे तर वाहन चालक पदांसाठी 515 पदे तर SRPF शिपाई: 1,566 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. तसेच बॅन्डस्मन 113 पदे आणि कारागृह शिपाईसाठी 554 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.

Police Bharti

युनिटनिहाय प्रमुख रिक्त पदे

  • मुंबई: 2,643

  • पुणे शहर: 1,968

  • ठाणे: 654

  • नागपूर: 725
    इतर जिल्ह्यांतील पदांसाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीत तपशील पाहावा.

Police Bharti

शैक्षणिक पात्रता

पोलीस शिपाई, वाहन चालक, SRPF, कारागृह शिपाई या पदासाठी 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर बॅन्डस्मन पदासाठी उमेदवारांनी इयत्ता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Police Bharti

शारीरिक अटी

  • पुरुषांची उंची: किमान 165 सेमी

  • महिलांची उंची: किमान 155 सेमी

  • छाती (पुरुष): 79 सेमी (न फुगवता), 84 सेमी (फुगवून)

Police Bharti

वयोमर्यादा

30 नोव्हेंबर 2025 पर्यंत उमेदवाराचे वय पोलीस शिपाई, बॅन्डस्मन, कारागृह शिपाई या पदासाठी 18–28 वर्षे असावे. तसेच वाहन चालकासाठी 19–28 वर्षे तर SRPF, शिपाईसाठी 18–25 वर्षे असणे आवश्यक आहे. मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षांची सूट मिळेल.

Police Bharti

Next : लाडकी बहीण योजनेत मोठा बदल! पती किंवा वडील नसलेल्या महिलांनाही मिळणार मोठा फायदा, वाचा प्रोसेस

येथे क्लिक करा