Mangesh Mahale
निखिलकुमार हे सेवानिवृत्तीनंतर राजकारणात सक्रिय झाले होते. बिहारमधून काँग्रेसच्या तिकीटावर त्यांनी निवडणूक लढवली होती. ते निवडून आले होते.
बी.डी. राम हे १९७३ च्या तुकडीतील ते 'आयपीएस' अधिकारी आहेत. त्यांनी झारखंडमधून लोकसभेची निवडणूक जिंकली होती. यावेळी पुन्हा निवडणूक लढवत आहेत.
रामेश्वर उराव झारखंड सरकारमध्ये वाणिज्यमंत्री आहेत. १९८९ मध्ये बेगूसरायमधून ते लोकसभेत पोहोचले. केंद्रातही ते मंत्री होते.
अशोककुमार गुप्ता हे आरजेडीतून राजकारणात सक्रिय झाले आहेत. विचारवंत गटाचे ते अध्यक्ष आहेत.
आशिष रंजन यांनी पोलिस महासंचालकपदावरुन निवृत्त झाल्यानंतर राजकारणात आले , पण त्यांना यश आले नाही.
डी.एन. सहाय यांनी बिहारमधील राजकारणातून निवडणूक लढविण्याची आकांक्षा पूर्ण केली आहे.
तमिळनाडूतील बी. के. रवी यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती.