Deepak Kulkarni
UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्यापूर्वी तृप्ती भट्ट यांनी तब्बल 16 सरकारी नोकऱ्यांना नकार दिला होता.
‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ म्हणजेच इस्रो [ISRO] सारख्या मोठ्या संस्थेतून तिला नोकरीसाठी विचारण्यात आले होते.
दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना तिच्यासाठी दिलेल्या हस्तलिखित पत्रामुळेच तृप्तीला देशसेवेची प्रेरणा मिळाली...
तृप्तीने पहिल्याच प्रयत्नात 2013 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण होत 165 वा नंबर पटकावला.
तृप्तीच्या कुटुंबातील बहुतांश लोक हे शिक्षकी पेशातील आहे.
तृप्ती ही उत्तराखंडमधील अलमोर येथील असून त्यांना तीन भावंडं आहेत. त्या चौघांमध्ये सर्वात मोठी आहे.
तृप्ती भट्टने लहान वयातच अफाट बुद्धिमत्तेची चुणुक दाखवली होती.
तृप्ती भट्ट या सध्या डेहराडूनमध्ये एक गुप्तचर आणि सुरक्षा एसपी म्हणून काम करत आहे, अशी माहिती आहे.