सरकारनामा ब्यूरो
घरची परिस्थिती प्रचंड हलाकीची, साधे वडिलांच्या अंत्यविधीलाही पैसे नव्हते. कठीण परिस्थितीवर मात करत IAS झालेले रमेश घोलप यांचा प्रेरणादायी प्रवास.
वडिलांचे सायकलचे दुकान होते पण ते मद्यपान करत असल्याने रमेश घोलप यांनी त्यांच्या आईबरोबर बांगड्या विकत आपल्या घराला हातभार लावला.
लहानपणी पोलिओ डोस न घेतल्याने त्यांना अपंगत्व आले. तरीही प्रचंड कष्ट करत त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केले.
पुढील शिक्षणासाठी ते त्यांच्या मामाच्या गावी बार्शीला गेले. बारावीचे शिक्षण घेत असताना 2005 मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांच्यांकडे अंत्यसंस्काराला जाण्यासाठी बसचे तिकीट काढायला 7 रुपयेही नव्हते.
कठीण परिस्थितीतही घोलप यांनी 88.5 टक्के गुणांसह त्यांचे 12वीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर डिप्लोमा करत गावातील एका शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करु लागले.
रमेश घोलप यांनी UPSC परीक्षेसाठी नोकरी सोडली. आणि परीक्षेची तयारी सुरु केली.
2012 ला दिव्यांग कोट्यातून 287 वा रँक मिळवत रमेश घोलप हे आयएएस अधिकारी बनले.
रमेश सध्या झारखंड येथील छतरा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत. त्यांनी याआधी गढवा,कोडरमा या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते. धनबाद येथे त्यांनी महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळला आहे.